मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे ट्वीट; आगामी निवडणुकांबाबत भाजपसोबत…

264
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे ट्वीट; आगामी निवडणुकांबाबत भाजपसोबत...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे ट्वीट; आगामी निवडणुकांबाबत भाजपसोबत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी, ४ जून रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत, तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. पण आता यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून शहांसोबतच्या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

ट्वीटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शहा यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.’

(हेही वाचा – एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावे – विनोद तावडे)

तसेच पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.