कोरोना काळातील पाप कुठे फेडणार? CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

केंद्रामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचे आहे.

136
कोरोना काळातील पाप कुठे फेडणार? CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

२०२४ च्या लोकसभा (Lok sabha election 2024 ) निवडणुकीला अवघे ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान सर्वच पक्षाने राजकीय प्रचारांचा धडका लावल्याचे दिसून येते. आज महायुतीची पुण्यात पदाधिकारी मेळावा झाला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.राज्यामध्ये विकासाचे पर्व आले असून राज्याचा सर्वांगीण विकास करत आहोत. केंद्रामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra  Modi) यांना निवडून आणायचे आहे, असंही शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही वाचा – राज्यात विकासाची गंगा वाहतेय; CM Eknath Shinde यांनी सासवडच्या सभेत साधला संवाद

एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होतील, असे वातावरण या ठिकाणी आहे. राज्यामध्ये विकासाचे पर्व आले असून राज्याचा सर्वांगीण विकास करत आहोत. केंद्रामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)  यांना निवडून आणायचे आहे. महाराष्ट्रामधून आपण ४५ हून अधिक खासदार निवडून दिल्लीत पाठवायचे आहेत. त्यासाठी पुणेकरांनी एक सुशिक्षित उच्चविद्याभूषित असा उमेदवार निवडून दिल्लीत पाठवावा, असे आवाहन केले. (CM Eknath Shinde)

हेही वाचा –BRS leader K Kavitas : दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरण ; BRS नेत्या के. कविता यांच्या अडचणीत वाढ 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “कोरोना काळात (Corona) आम्ही राज्यातील जनतेचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंदिवस काम करत होतो. तर काही लोक कोरोना काळात भ्रष्टाचार करत होते. त्यांनी खिचडी, डेड बॉडी बॅग मध्ये आणि ऑक्सिजन प्लांटमध्ये भ्रष्टाचार केला. पुण्यातील एका हॉस्पिटलमध्येही भ्रष्टाचार केला. हे पाप कुठे फेडणार, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची नाव न घेता केली. (CM Eknath Shinde)

हेही वाचा – Amit Shah : महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र, तिघांची रिक्षा; अमित शहा यांचा महायुतीवर हल्लाबोल 

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कुटुंबामधूनच पेहलवान वारसा आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये देखील त्यांनी मोठे योगदान दिले आहे. पेहलवान असल्याने कधी कुठला डाव टाकायचा ते त्यांना माहीत असते. त्यामुळे स्वार्थासाठी राजकीय पक्ष बदलणारा उमेदवार त्यांच्यासमोर टिकणार नसून आखाडा तर मुरलीधर मोहोळ जिंकणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (CM Eknath Shinde)

हेही पाहा 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.