कोणती भाकरी फिरवायची ते शरद पवारांनाच विचारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नागपुरात शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

176
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोणती भाकरी फिरवायची ते पवारांनाच विचारा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर बोलताना ‘योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते अन्यथा करपते’ असे विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नागपुरात प्रतिक्रिया दिली. पवारांच्या बोलण्याचा अर्थ काय आणि कोणती भाकरी फिरवायची हे त्यांनाच विचारा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पवार बोलले की त्यांच्या काही गोष्टी गांभीर्याने घेत असतो. या संदर्भात त्यांच्याशी बोललात तर बरे होईल. काल बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल माझी आणि त्यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. या प्रकल्पाबाबत लोकांना विश्वासात घेतले पाहिजे असे पवारांचे म्हणणे होते. कुठल्याही परिस्थितीत लोकांवर अन्याय करून वा जबरदस्तीने करण्याच्या मन:स्थितीत आम्ही नाही. बारसुतील स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प केला जाईल. कोणताही प्रकल्प तात्काळ उभा राहत नाही. अजून खूप प्रक्रिया बाकी आहे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंबद्दल मी काही बोलू शकत नाही. ते रोजच बोलतात असे म्हणत दुर्लक्ष केले.

(हेही वाचा – Ajit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सल्ल्याचा अजित पवारांनी ‘असा’ काढला अर्थ)

राज ठाकरेंच्या मुलाखतीवर भाष्य करणे मुख्यमंत्र्यांनी टाळले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीबद्दल विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले. अलिकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे. अजितदादा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवारही त्यांच्यामुळे अस्वस्थ आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापनेच्या गोष्टी सुरू आहे. पवारांचा इशारा याकडे असल्याचीही चर्चा आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.