CM Eknath Shinde : महायुतीचा धर्म पाळावा लागेल!; मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवतारेंना सल्ला

मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यानंतरही शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे बारामतीवरून महायुतीत खटके उडण्याची चिन्हे आहेत.

129
CM Eknath Shinde : महायुतीचा धर्म पाळावा लागेल!; मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवतारेंना सल्ला

लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यानंतरही शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे बारामतीवरून महायुतीत खटके उडण्याची चिन्हे आहेत. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याचा पवित्रा घेतला आहे. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी सोमवारी (१८ मार्च) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी चर्चा केली. (CM Eknath Shinde)

आज पत्रकार परिषदेत शिंदे यांना शिवतारे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता, लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळावा लागणार असल्याचे सांगितले. महायुती म्हणून आम्ही ताकदीने ही निवडणूक लढू, असे शिंदे म्हणाले. महायुतीतील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. जागावाटपाबाबत चिंता करण्याचे कारण नाही. जागावाटपाविषयी योग्य निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबईतील सर्व होर्डिंग, पोस्टर, बॅनर तत्काळ हटवावे; चहल यांचे निर्देश)

अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे ब्लॅकमेलिंग – शिवतारे

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विजय शिवतारे त्यांनी अजित पवार यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. अजित पवार यांनी माझा आवाका काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? असे अजित पवार बोलले होते. माझा अवाका नाही तर कशाला धडपड करत? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करता . इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू असे इशारे का देता? असा सवाल शिवतारे यांनी केला. माझा पाठिंबा जनतेला आहे. जनता सांगेल तेच मी करणार. महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन-चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

दोन-तीन दिवसानंतर पुन्हा माझी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. लोकांशी चर्चा करून निर्णय होईल.यांनी पालकमंत्री असताना इतका नालायकपणा केला की ते मला भेटायलाही आले नाहीत. मी कुणासाठी लढत होतो? गुंदवलीच्या पाण्यासाठी लढत होतो. त्यात माझी किडनी गेली आणि हृदय गेले. तरीही मी त्यांना माफ केले. पण पुरंदरची आणि बारामतीची जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.