काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर CM Devendra Fadnavis यांचा पलटवार; म्हणाले, ‘बदनाम हुए तो…’

101
CM Fadnavis यांच्या बैठकीआधी ‘दोन बॅग’ची चर्चा; पदाधिकाऱ्यांच्या स्पेशल किटमध्ये नेमकं काय?
CM Fadnavis यांच्या बैठकीआधी ‘दोन बॅग’ची चर्चा; पदाधिकाऱ्यांच्या स्पेशल किटमध्ये नेमकं काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शब्दांचे युद्ध चांगलेच पेटले आहे. मंगळवारी ४ ऑगस्टला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्यावर काँग्रेस (Congress) पक्षाने टिप्पणी करत त्यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ (Gungi Gudiya) असा केला होता. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण वादावर भाष्य करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या या वक्तव्याचा कडक शब्दांत समाचार घेतला असून, विरोधी पक्षाचे हे वर्तन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावणारे असल्याचे म्हटले आहे. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Water Leakage : टिटवाळ्यातील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती)

मुख्यमंत्री फडणवीसांचे जशास तसे उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. “बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ” अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Kalyan Fata Protest: कल्याण फाटा वाहतूक कोंडी प्रश्नावर नागरिकांनी उठवला आवाज, तातडीने उपायोजना करण्याची मागणी)
धनंजय मुंडेंचीही काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या टीकेवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते म्हणाले की, ‘काँग्रेसच्या अधिकृत पेजवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या, याचा द्वेष आहे. तसेच किती घृणा आहे. काँग्रेसने त्यांचा इतिहास पाहिला असता, खरंतर इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी कणखर काम केलं. त्याच्यापेक्षाही कणखर काम येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करून दाखवतील. काँग्रेसच्या पेजवरून हाच द्वेष पाहायला मिळाला’.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.