संजय राऊत म्हणजे “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”; Chitra Wagh यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

120
संजय राऊत म्हणजे "बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना"; Chitra Wagh यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणजे “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” आहेत, अशा शब्दात भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. (Chitra Wagh)

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात भाजपाला फक्त ९ तर महायुतीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणणारे आता “मला जाऊ द्या ना घरी” म्हणत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. त्यामुळे चित्रा वाघ यांनी एक्स समाज माध्यमावर राऊत यांना प्रत्युत्तर दिले. (Chitra Wagh)

(हेही वाचा – “… म्हणून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली”, Chandrasekhar Bawankule नेमकं काय म्हणाले?)

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, ओऽऽऽऽटीनटप्पर सर्वज्ञानी संजय राऊत, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’सारखं दुसऱ्याच्या वरातीत नाचण्यात तुमचा हातखंडा आहे. देवेंद्रजींच्या रेकॅार्डची चिंता तुम्ही करू नका. अडथळ्यांवर मात करून पुढं जाण्याचे त्यांचे रेकॅार्ड आहे. तुमचे रेकॅार्ड रसातळाला गेले ते पाहा. भाजपाची साथ सोडून स्वत:च्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतली आणि निम्म्यावर घसरलात पण तरीही लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे तुम्ही आधुनिक शकुनी शोभता खरे..!, असे वाघ म्हणाल्या. (Chitra Wagh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.