“… म्हणून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली”, Chandrasekhar Bawankule नेमकं काय म्हणाले?

95
"... म्हणून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली", Chandrasekhar Bawankule नेमकं काय म्हणाले?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज (६ जून) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या विधानावर भाष्य केलं. “आम्ही संविधान बदलणार हा खोटा प्रचार केला. सर्वत्र खोट पसरवलं. आदिवासी समाजात खोट्या बातम्या पसरवल्या. त्यांचा हक्क काढून घेणार, त्यांच्या अधिकारांवर गदा आणणार. मराठा समाजाला सांगितलं, आम्ही मराठा आरक्षणाविरोधात आहोत. जातीपातीच राजकारण केलं, गोंधळाच राजकारण विजयात बदलल. विकासाच राजकारण आम्ही केलं. पण आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Chandrasekhar Bawankule)

“हे लोक जातीयवादाच राजकारण करुन जिंकू शकतात”

“देशाला पुढे नेण्यासाठी मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला. आम्ही विकसित भारतासाठी मत मागितली. इंडिया आघाडीने जातीच राजकारण केलं, त्या आधारावर मत मागितली. हे काही दिवसांसाठी ठीक आहे. प्रत्येक समाजाला समजेल, इंडिया आघाडीने खोट बोलून मत मागितली. हे लोक जातीयवादाच राजकारण करुन जिंकू शकतात. यांच्याकडे सांगण्यासारख विकासाच काम नाही. फक्त नरेटिव्ह सेट करु शकतात.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आता EVM वर का बोलत नाही? असा सवाल बावनकुळेंनी विचारला. “जनता एकदा भ्रमित होऊ शकते, वारंवार होत नाही. विकासाचा राजकारण देशाला पुढे घेऊन जाणार.” असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.

“महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या वाटेवर येईल”

“या राज्यात साडेसहाकोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे. प्रत्येकाला घरकुल देण्याच काम झालं. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कृषी सन्मान योजना आणली, तरीही जनतेने काही क्षणांसाठी आमच्यापासून दूर जाऊन जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वाईट वाटलं. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र भाजपाच्या कोअर ग्रुपने त्यांना विनंती केलीय ते आमची विनंती मान्य करतील अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहून संघटनेच काम करु शकतात. हे भ्रमित, जातीपातीच राजकारण यातून महाराष्ट्र बाहेर येऊन पुन्हा विकासाच्या वाटेवर येईल.” असं बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.