चीनचा कोणत्याही देशाशी थेट अथवा शीतयुद्धाचा मनसुबा नाही – जिनपिंग 

98

न्यूयॉर्क – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना अनपेक्षितपणे  शांततेचा राग आवळला. चिनी सैन्याच्या आक्रमक वृत्ती आणि युद्ध सरावाच्या पूर्ण उलट वक्तव्य जिनपिंग यांनी केले. चीनचा कोणत्याही देशाशी थेट अथवा शीतयुद्धाचा मनसुबा नाही. देशांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. पण ते चर्चेच्या माध्यमातून सोडवायला हवेत, असे जिनपिंग म्हणाले.

चीन हा जगातील सर्वात मोठा विकसनशील देश आहे, जो शांततापूर्ण, मुक्त, सहकारी आणि सामान्य विकासासाठी वचनबद्ध आहे. आम्ही साम्राज्यवादाचा कधीच प्रयत्न केला नाही. करोनाचा संसर्ग पसरवल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर केला. करोना व्हायरसच्या मुद्द्यावरू राजकारण करणं किंवा कलंक लावण्याच्या प्रयत्न फेटाळले पाहिजेत. सध्या आपण करोना व्हायरस विरोधात लढत आहोत. या व्हायरसमुळे संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं आहे. चीनने विकसित केलेली करोना व्हायरसवरील लस मानवी चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात आहे. ही लस तयार झाल्यावर ती वापरासाठी उपलब्ध केली जाईल. चीनने आपली लस जगातील सर्व देशांना देईल. ही लस इतर विकसनशील देशांना प्राधान्याने दिली जाईल, असं जिनपिंग म्हणाले.

काश्मीर मुद्यावर तुर्कीचे भारताविरोधात फुत्कार

 

तुर्कीचे राष्ट्रपती रेचप तैय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावर भारताविरोधात गरळ ओकली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित करताना त्यांनी काश्मीरचा राग आळवला. जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा (राज्य घटनेतील ३७० कलम) हटवल्यानंतर समस्या आणखीच वाढली असल्याचे त्यांनी म्हटले. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावानुसार यावर मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानचे कौतुकही केले.

भारताचा तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या भाषणावर आक्षेप 

संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे प्रतिनिधी पीआर. कृष्णमुर्ती यांनी तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या भाषणावर आक्षेप नोंदवले. तुर्कीचे राष्ट्रपती भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत आहेत. त्यांचे हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. तुर्कीने इतर देशांचा सन्मान करणे आवश्यक असून त्यांनी स्वत: च्या देशातील धोरणांबाबत विचार करण्याची आवश्यकता असल्याचे भारताने म्हटले. यापूर्वीही एर्दोगान यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली आहे. इतकेच नव्हे तर करोना महासाथीच्या आजारातही त्यांनी काश्मीरमध्ये भारत सरकारने स्थानिक जनतेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोपही लावला होता. काश्मीर प्रश्नावर भारताला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करणारे एर्दोगान स्वतः तुर्कीमध्ये कट्टर इस्लामिक हुकूमशहा म्हणून ओळखले जातात, असे यात म्हटले आहे.

सोमवारपासून संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन सुरू झाले. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे सहभागी १९३ देशांच्या प्रत्येक प्रतिनिधिनीने त्यांचे भाषण रेकॉर्डिंगमध्ये पाठवून दिले. मंगळवारपासून या भाषणांना प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या जगासमोर जी आव्हाने आहे, त्याला जुन्या पध्द्तीने सामोरे जाणे थांबवले पाहिजे, तसे केले नाही तर संयुक्त्त राष्ट्र संघाच्या प्रति विश्वास उडून जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.