प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ (Gungi Gudiya) या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal)
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांबाबत अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणे योग्य नाही. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र टीका करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत. काँग्रेससारख्या पक्षाकडून अशी भाषा वापरली जाणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. (Chhagan Bhujbal)
(हेही वाचा – एक लाखाहून अधिक Bangladeshi निघून गेले; आता एसआयआर बाहेरील २० लाख लोक सरकारी लाभांपासून वंचित)
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचाही संदर्भ दिला. विरोधकांनी त्यांनाही एकेकाळी ‘गुंगी गुडिया’ अशी उपाधी दिली होती. मात्र, इंदिरा गांधी यांनी आपल्या कामगिरी आणि नेतृत्वाच्या बळावर त्या टीकेला उत्तर दिले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन उपरोधिक टिप्पणीवरून नव्हे, तर तिच्या कार्यावरूनच केले जाते, असे भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात जाऊन निषेध नोंदवल्याच्या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी हिंसाचार किंवा तोडफोड झाल्याचे आरोप फेटाळले. कार्यकर्त्यांनी केवळ निषेध व्यक्त केला असून कोणतीही मालमत्तेची हानी झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या सल्ल्यालाही छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. रस्त्यावर कधी उतरायचे आणि आंदोलन कसे करायचे, याचे धडे आम्हाला देण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा इतिहास अधोरेखित केला.
(हेही वाचा – Electricity Bill : शासकीय कार्यालयांसाठी संयुक्त वीज बिलिंग प्रणाली )
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) या आगामी काळात आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःचे नेतृत्व सिद्ध करतील, असा विश्वास व्यक्त करत भुजबळ यांनी राजकारणात वैयक्तिक टीकेपेक्षा कामगिरीला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असेही नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

