राणे बंधू ‘त्या’ वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत, गुन्हा दाखल!

116

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांची ईडीकडून केली जाणारी विचारणा आणि त्यांना झालेली अटक यांची जोरदार चर्चा सुरु आहे. राजकीय वर्तुळात यावरुन वातावरण तापलेलं असतानाच, आता निलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत थेट शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचं विधान केलं आहे. तसेच, आमदार नितेश राणेंकडूनही अशी विधान केली गेली असल्यानं, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधुविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता राणे बंधुंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

…म्हणून गुन्हा दाखल

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्याकडून निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नितेश राणे या दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हणाले निलेश राणे ?

मला संशय येतो की, शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरचं संशय येतो. ज्यांनी दाऊदशी व्यवहार केला, दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, दाऊदच्या माणसांना पैसे दिले, बाॅम्बब्लास्ट करणा-यांना पैसे दिले. त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. अनिल देशमुखांनी काय केलं होतं? कसा झटपट राजीनामा घेतला होता. विचार केला होता का? मग नवाब मलिक कोण आहे ? अशी भीती आहे का? की नवाब खर बोलले, तर पवारांविषयी माहिती बाहेर येईल, असं काही आहे का? असं निलेश राणे पत्रकार परिषदेत बोलले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.