Canada-India Relations: पन्नू प्रकरणानंतर आता भारतासोबत संबंध सुधारत आहेत, कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे मत

117

भारतासोबत संबंध सुधारत असल्याचे कॅनडाचे म्हणणे आहे. कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांनी सांगितले की, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांमधील तणाव आता कमी होत आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. मुलाखतीदरम्यान एनएसए थॉमस यांनी अमेरिकेचाही उल्लेख केला होता. अमेरिकेने भारतावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे.

(हेही पहा – Fastest Triple Century in FC : तन्मय अगरवालचं प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान त्रिशतक साजरं)

एनएसए थॉमस म्हणाले, अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने आमच्याशी सहकार्य वाढवले आहेत. डिसेंबर 2023मध्ये पीएम ट्रुडो यांनी असेही म्हटले होते की, पन्नू प्रकरणानंतर भारताचा सूर बदलला आहे.

भारतासोबत चर्चा –
– कॅनडाच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थॉमस म्हणाले की, भारत आम्हाला सहकार्य करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. आम्ही निज्जर प्रकरणात पुढे जात आहोत. भारतीय NSAसोबत केलेल्या चर्चेचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.