Budget Session 2024: पुणे अपघात प्रकरणावरुन विरोधक आक्रमक; फडणवीसांनी विधिमंडळात दिली धक्कादायक माहिती!

168
Budget Session 2024: पुणे अपघात प्रकरणावरुन विरोधक आक्रमक; फडणवीसांनी विधिमंडळात दिली धक्कादायक माहिती!
Budget Session 2024: पुणे अपघात प्रकरणावरुन विरोधक आक्रमक; फडणवीसांनी विधिमंडळात दिली धक्कादायक माहिती!

पुणे अपघात प्रकरणावरुन (pune Porsche car accident) विरोधक विधिमंडळात (Budget Session 2024) आक्रमक झाले. पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी सरकारला या मुद्द्यावरून घरले. यानंतर रोहित पवार, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले. लक्ष्यवेधीच्या माध्यमातून त्यांनी सरकारला या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारले. या लक्ष्यवेधीचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले.

पोर्शे कार अपघातातील कारचा वेग प्रतितास 110 किमी!

फडणवीसांनी पोर्शे कार अपघाताची माहिती विधिमंडळात (Budget Session 2024) दिली. ‘पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आले आहे. या सर्व बाबी रेकॉर्डवर आणण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर विधिसंघर्षग्रस्त बालकाने ब्रेक मारला होता तेव्हा त्या कारचा वेग हा 110 किमी प्रति तास हा होता. तो बालक कार अत्यंत वेगात चालवत होता. चूक करणाऱ्या पोलिसांचं निलंबन केलं. पुण्याचा उडता पंजाब झालं, हे म्हणणं योग्य नाही. घटना गंभीर आहे, पण पुण्याची बदनामी करू नका. आरोपीच्या वडिलांनी आणि आजोबांनी गाडीच्या चालकावर दबाव आणला. आरोपीचे वडील आणि आजोबांवर गुन्हा दाखल केला आहे. चालकाला दोघांनी एक दिवस घरात डांबून ठेवलं होतं. गरीब-श्रीमंत असं काही नाही, न्याय सर्वांना समान आहे. पोलिसांनी मेडिकलला रात्रीच पाठवलं नाही ही पोलिसांची चूक आहे. ससूनमध्ये पैशाचा वापर करून न्याय ओरबाडण्याचा प्रयत्न झाला.’ अशी माहिती फडणवीसांनी दिली.

तीन लाख रुपये घेऊन डॉक्टरांनी रक्ताचा नमुना बदलला

‘तो अगोदर बसलेल्या बारचे सीसीटीव्ही फुटेज, बील जप्त करण्यात आले. तो दुसऱ्या बारमध्ये बसला होता. तेथीलही सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले आहेत. त्याच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. मुलाला गाडी चालवायला दिली म्हणून हा मुलाच्या वडिलावर गुन्हा दाखल केलेला आहे. मुलाच्या आजोबांवरही गुन्हा दाखल केला. तीन लाख रुपये घेऊन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलला. असेही फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांनी या विधिसंगृहित बालकाला अडल्ट गृहित धरावे, अशी मागणी केलेली होती.’ असं पुणे कार अपघातप्रकरणी देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. (Budget Session 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.