Budget Session 2024: जेव्हा मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा छान म्हणायचे, त्यामुळे त्यांच्या टीकेला काही अर्थ नाही; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

103
पत्रकारांची Eknath Shinde यांच्याकडे तक्रार, मागण्यांचे निवेदन
पत्रकारांची Eknath Shinde यांच्याकडे तक्रार, मागण्यांचे निवेदन

अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत होते. त्याचवेळी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक समोर ठेवून बजेट मांडले, अशी टीका केली आहे. त्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला टोला लगावला आहे.

अजित पवार म्हणाले की, मी ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होतो. त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते मला फार छान आहे, फार छान आहे, असे म्हणायचे. आता मी इकडे आहे म्हणून म्हणतात, त्यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

(हेही वाचा – Budget Session 2024: अर्थसंकल्पातून महिला सक्षमीकरणाचा नारा, प्रत्येक जिल्ह्यात १ लाख महिलांना मिळणार शासकीय योजनेचा लाभ)

अजित पवारांनी टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसही ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले की, खरं म्हणजे, उद्धव ठाकरेंनी यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, मला अर्थसंकल्प कळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चार महिन्यांचा अर्थसंकल्प असला तरीही हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. मोदींच्या विकसित भारत या अर्थसंकल्पनेला पूरक, असा अर्थसंकल्प आहे. शहरी, ग्रामीण, रेल्वेमार्गांना यामध्ये प्राधान्य दिले आहे. एकंदरीत सर्व घटकांचा यामध्ये समावेश आहे. महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.