अमृता फडणवीस धमकी प्रकरण : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

104

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी धमकावल्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यानंतर आता अखेर अनिक्षाचे वडील बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून मुंबई सायबर गुन्हेशाखेकडून अटक करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे ऑडिओ क्लिप्स आणि इतर डाटा नष्ट करण्यासाठी आरोपीने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटींची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून याचप्रकरणी अनिल जयसिंघानीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने फरार असणाऱ्या अनिल जयसिंघानी यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखाने ऑपरेशन ए.जे हाती घेऊन ७२ तासांच्या शोधमोहिमेनंतर अखेर अनिल जयसिंघानी याला गुजरातच्या गोध्रा येथील कल्लोल येथून अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याचा एक नातेवाईक आणि वाहन चालक यांना देखील अटक करून मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

( हेही वाचा : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ! नागरिक भयभीत, तब्बल दोन तासानंतर केले जेरबंद; पहा व्हिडिओ )

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिक्षाने आपले वडील एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे.

अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानीवर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानीचा शोध घेत होते. अखेर गुजरातमधून जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

कोण आहे हा अनिल जयसिंघानी ?

अनिल जयसिंघानी हा कुख्यात क्रिकेटबुकी आहे, त्याच्यावर १५ गुन्हे दाखल असून ७ वर्षांपासून तो फरार होता. अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे उकळणे त्यांना ब्लॅकमेल करणे असे आरोप त्याच्यावर आहेत. अनिल जयसिंघानी हा एक मोठा सट्टेबाज आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान त्याने अनेक कोटींचा सट्टा लावला होता. अनिल जयसिंघानी हा उल्हासनगरचा रहिवासी असून तो मोठ्या प्रमाणात लाच देऊन पोलिस अधिकाऱ्यांना अडकवतो, रोख रक्कम सुपूर्द करतो आणि नंतर पोलिसांना ब्लॅकमेल करतो. त्याने एका पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करून तक्रार दाखल केली होती, त्यानंतर या उपायुक्तांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता. जयसिंघानी दुबई, कराची आणि दिल्लीतील बेटिंग सिंडिकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे. अव्वल बुकी बनण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेने तो प्रतिस्पर्धी बुकींची माहिती पोलिसांना द्यायचा आणि त्यांच्यावर छापा टाकायला लावत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.