BMC Election 2026 : २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला; भाजपाची ठाकरेंवर टीकेची झोड

53

BMC Election 2026 :      महापालिका निवडणुकीकरिता लवकरच मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.(BMC Election 2026) मतदानाआधी मुंबईत राजकीय पक्षांत चांगलीच जुंपली असून भाजपाकडून ठाकरेंवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेली बनवा- बनवी समोर मांडतानाच मागील २५ वर्षात ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.(BMC Election 2026)

(हेही वाचा BMC Election : निवडणुकीच्या प्रचाराचा ‘नारळ’ फुटला; चाळी-सोसायट्यांमधून उमेदवारांचे ‘डोअर-टू-डोअर’ मिशन सुरू )

बीएमसीमधील १९९७- ते २०२२ कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातील मोठा भ्रष्टाचार , टू जी, थ्रा जी, फोर जी, गोलस्कॅम याचा आकडा तुम्ही गुगल करा, याचा आकडा १७६ कोटीच्या वरती नाही आहे. त्यांनी १९९७-२०२२ या कालावधीत या २५ वर्षामध्ये या देशात घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणेज ३ लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगर पालिकेत केला आहे. बीएमसी रडत आहे, किंचाळत ओरडत आहे, ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे. लचके तोडून दशकोदशकी घायाळ ज्यांनी तिला केलं आहे त्या पापांचा हिशेब आता जगाकडे ती मागत आहे, अशी घणाघाती टीका भाजपाने ठाकरेंवर केली. दरम्यान, शिक्षणाचा देखील घोटाळा १८२ कोटीचा केल्याचे भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.(BMC Election 2026)

(हेही वाचा Municipal Corporation : महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले हिंदू महासभेचे उमेदवार )

ते म्हणाले, तु दिलेस ज्यांना निवडून त्यांनी नगरीला काय दिले, भरुन पोतड्या बंगले बांधून नगरीला या नागविले. मुंबई शहर हे रस्त्याकरिता खुप प्रसिद्ध आहे, जगभरात प्रसिद्ध आहे. रेल्वेस्टेशन, एअरपोर्ट, रिक्षा गाड्या चालतात, त्या शहराचा रस्ता कसा आहे, यावरुन त्या शहराचे मत आपण ठरवित असतो. मुंबई शहराच्या रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते, ही चर्चा अनेक वर्षे ऐकतो, असेही अध्यक्ष साटम यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी देखील मुंबईचे प्रतिनिधित्व केलेलं आहे, दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांचा मुद्दा येतो. बीएमसीचे सभागृह तहकुब होतं, परत पुढच्या वर्षी येरे माझ्या मागंल्या. मी एक आरटीआय केला होता मुंबई शहराच्या रस्त्यावरती २१ हजार कोटी तब्बल खर्च झाला, असे उत्तर पालिकेच्या रस्ते खात्यांनी दिले होते, असेही साटमांनी यावेळी सांगितले.(BMC Election 2026)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.