Maharashtra Assembly session: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

117

शिवसेनेतून ३९ आमदार वेगळे करून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. त्यानंतर अनपेक्षित पणे भाजपने थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. राज्यपालांच्या आदेशानुसार रविवार, ३ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात आले. त्यात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. ज्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर बहुमताने निवडून आले, तर विरोधी पक्षाचे राजन साळवी पराभूत झाले.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: विधानभवनातील शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय सील)

भाजपच्या राहुल नार्वेकरांना १६४ मतं

विधानसभेच्या अध्यक्ष निवडीसाठीच्या विशेष अधिवेशनाच्या सुरूवातीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव सभागृहात मांडाला. या प्रस्तावानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तो प्रस्ताव मतदानास टाकला. आवाजी मतदानात बहुमताच्या बाजूने प्रस्ताव पारित होणार इतक्यातच विरोधी पक्षाकडून पोलची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हा प्रस्ताव मतदानास टाकला. त्यानंतर बहुमाताच्या बाजूने असणाऱ्यांना उपाध्यक्षांच्या उजव्या बाजूला आणि बहुमाच्या प्रस्तावाच्या विरोधात असणाऱ्यांना डाव्या बाजूस येण्यास सांगितले. त्यानुसार शिरगणती सुरू करण्यात आली, यावेळी भाजपच्या राहुल नार्वेकरांना १६४ मतं मिळाली.

मविआच्या राजन साळवींना १०७ मतं

त्यानंतर मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने आता मतदानाला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना मतदान केलं आहे. राजन साळवी यांना १०७ मतं मिळाल्याचे समोर आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.