पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे धरणे आंदोलन

82

काही दिवसांपूर्वी त्रिपुरामध्ये जाळपोळ झाली व या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटून नांदेड, मालेगाव, अमरावती याठिकाणी हिंसक घटना घडल्या. मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावर हल्ले सुद्धा झाले या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

हिंसक घटनांचा निषेध

या आंदोलनात नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनेचा निषेध करण्यात आला. जगदीश मुळीक म्हणाले, त्रिपुरामध्ये जाळपोळ झाली असा व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता. तरी नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक घटना घडल्या. महाविकास आघाडी सरकारला राज्यात मतांचे राजकारण करायचे आहे. असा आरोप मुळीक यांनी केला आहे. ज्या नागरिकांवर हल्ला झाला, तो राज्य सरकारने थांबवणे गरजेचे होते. म्हणून आज आम्ही नांदेड, मालेगाव, अमरावती येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करत आहोत असे जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : एसटी संपाचा तिढा कायम! २० डिसेंबरला होणार पुढील सुनावणी )

कारवाईची मागणी

महाराष्ट्रात हिंसक कारवाया घडवणाऱ्या संघटनेवर आधी कारवाई करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.