BJP : २०२४च्या आधी भाजपात होणार जोरदार पक्षप्रवेश

78
भाजप

देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीत व्यस्त दिसत आहेत. एकिकडे विरोधी पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसुद्धा वाढताना दिसत आहे.

दर महिन्याला इतर पक्षांचे नेते पक्षात सामील करून घेण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. सपा आमदार दारा सिंह चौहान भाजपमध्ये सामील झाले आहेत. सुभासपा अध्यक्ष ओपी राजभरही आता भाजपसोबत आहेत. याशिवाय, 24 जुलैला सपा आणि आरएलडीचे अनेक नेते भाजपत सामील होतील. आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपत सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपत प्रवेश घेऊ शकतात. सपा नेते जगदीश सोनकर, सपा नेते सुषमा पटेल, गुलाब सरोज आणि माजी आमदार अंशुल वर्मा हे देखील भाजपत सामील होऊ शकतात.

(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारचा धक्कादायक अहवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.