Uttar Pradesh Local Body Election : उत्तरप्रदेशात 17 महापौर, 99 नगराध्यक्ष भाजपचे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशात महापालिकांचे महापौर नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या.

133

उत्तर प्रदेशातील 17 महापालिकांमधील महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर नगरपालिकांच्या निवडणुकीत 199 पैकी 99 नगराध्यक्ष पदे देखील पटकावली आहेत. तर समाजवादी पक्षाचे 37, बहुजन समाज पक्षाचे 20 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. दरम्यान काँग्रेसला फक्त 4 नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशात महापालिकांचे महापौर नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. अलिगड, शहाजापूर, कानपूर, गोरखपूर, लखनऊ, मेरठ या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपने समाजवादी पक्षाचा पराभव केला आहे. तर बरेली, आग्रा, मुरादाबाद या नगरपालिकांमध्येही समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने तिथली नगराध्यक्ष पदे समाजवादी पक्षाकडून खेचून घेतली आहेत. झाशी, सहारनपूर, मथुरा वृंदावन, कन्नौज, हस्तिनापूर मध्ये देखील भाजपनेच विजय मिळवला आहे. योगींचा चेहरा आणि भाजपचे संघटन याचा चांगला मिलाफ या निवडणुकीत दिसल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचा Karnataka Assembly Election : काँग्रेसच्या राजवटीत आता हिजाब, पीएफआयला प्रोत्साहन बजरंग दलावर मात्र बंधन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.