BJP : विधानसभेच्या तयारीसाठी भाजपाच्या गुप्त बैठकांचे सत्र; ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती

132
BJP देशभरात उभारणार ७६८ कार्यालये

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रत्येक मतदारसंघाचे महत्व लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष देखील जबरदस्त तयारीत आहे. याची प्रचिती नागपूरमध्ये होणाऱ्या गुप्त बैठका वरून नक्कीच येऊ शकते. शिवाय केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांसह उपमुख्यमंत्री देखील बैठकीला उपस्थित राहत असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. (BJP)

(हेही वाचा- National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार)

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्व तयारीला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने किती गांभीयाने घेतले आहे, याचे चांगले उदाहरण सध्या नागपुरात पाहायला मिळत आहे. भाजपाच्या अलीकडच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्या राज्यातील एखादा प्रभारी नेमून त्यांच्या उपस्थितीत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ निहाय समीक्षा बैठका घेण्यात येत आहेत.
भाजपाचे माजी सरचिटणीस खास या बैठकांसाठी नागपुरात आले होते. दक्षिण पश्चिम नागपूर हा मतदारसंघ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघातही या सरचिटणीसाच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला फडणवीसही उपस्थित होते. (BJP)

भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस, पश्चिम बंगालचे माजी प्रभारी आणि मध्य प्रदेश सरकारचे विद्यमान मंत्री कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) नागपुरात दोन दिवसांपासून ठाण मांडून होते. त्यांना भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून नागपूर शहर आणि जिल्ह्याचे प्रभारी नियुक्त करन्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या नागपुरातील मंडळ स्तरावर समीक्षा बैठका सुरू आहेत. (BJP)

(हेही वाचा- Ration Card वर मिळणारा मोफत तांदूळ आता बंद! ‘या’ ९ गोष्टी मिळणार)

या बैठकांचे प्रारूप असे की, कोअर ग्रुपच्या पंचवीस तीस महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यानंतर मंडळ स्तरावरील शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख अशा सुमारे शे दोनशे महत्वपूर्ण कार्यकत्यांची बैठक घेतली जाते. (BJP)

अंतर्गत परीक्षण

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने काही अंतर्गत सर्व्हे केले आहेत. या सर्वेचे अह‌वाल पक्षाला प्राप्त झाले आहेत. या सर्वेनुसार भाजपासाठी विदर्भातील वातावरण फार उत्साहवर्धक दिसत नाही. नागपूरमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सहा पैकी चार जागा टिकवण्यात यश मिळवले होते. पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर अशा या चार जागा असून किमान या जागा आपल्या हातून निसटू नये यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केलेत. कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठका हा याचाच एक भाग आहे. (BJP)

(हेही वाचा- Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा )

फॉर मीडिया नो एन्ट्री

बैठकांना माध्यमांना प्रवेश देण्यात आलेला नाही आणि प्रवक्त्यांनाही या बैठकीबाबत किंवा बैठकीत झालेल्या चर्चेबाबत बोलण्यास मनाइ करण्यात आली आहे. मात्र काही कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता असे कळाले की, भाजपासाठी विधानसभेची प्रत्येक जागा आणि मत महत्त्वाचे आहे. एका कार्यकत्यांने सांगितले की, पक्ष नेतृत्वाने या समीक्षा बैठका घेण्यापेक्षा एकेका आमदाराच्या कार्यालयात सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांचीगा-हाणी, तक्रारी ऐकून घ्यायला कोणी तयार असतं का ते पाहायला हवं. साधे चहा सोडा, पाणी सुद्धा कोणी विचारतं का ते पाहायला हवं. (BJP)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.