BJP : भाजपने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बदलले

191
BJP : भाजपने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बदलले
BJP : भाजपने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बदलले

वंदना बर्वे

देशातील ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने ४ राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडमध्ये बदल झाला आहे. काँग्रेसमधून आलेल्या सुनील जाखड यांना पंजाबमध्ये, डी. पुरंदेश्वरी यांना आंध्रमध्ये, जी. किशन रेड्डी यांना तेलंगणात आणि बाबूलाल मरांडी यांना झारखंडमध्ये अध्यक्ष करण्यात आले आहे.

(हेही वाचा – BJP : भाजपचे विविध राज्यात बैठकांचे सत्र; काही राज्याचे प्रदेशाध्यक्ष बदलणार)

सोमवारी, प्रगती मैदानातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट सहकाऱ्यांसोबत ५ तासांची बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत गेल्या ४ वर्षांतील विविध मंत्रालयांच्या कामकाजाबाबतही चर्चा झाली. सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्र्यांना उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यास सांगितले आहे. विविध मंत्रालयांच्या कामकाजावर पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.