जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस; भाजप नेत्याची वादग्रस्त घोषणा

121

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात ठिकठिकाणी निषेर्धात आंदोलन केले जात आहेत. असे असूनही जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आता जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटण्याचे आवाहन करत १० लाखांचे बक्षीस भाजप पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

‘अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसे चालेल’, असे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे. जालन्यात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेर्धात मोर्चा काढून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यादरम्यान प्रसार माध्यमांसोबत बोलताना भाजप ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले.

(हेही वाचा – ..तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अजरुद्दीन, शरदचा समशुद्दीन झाला असता; पडळकरांचा जोरदार हल्लाबोल)

कपिल दहेकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादीच्या पक्षाला पिढ्यान-पिढ्या होऊनही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही. म्हणून आम्ही आव्हाडांच्या निषेर्धात मोर्चा काढला. त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. आता संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की, ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड दिसेल, त्या ठिकाणी या व्यक्तीची जो कोणी जीभ छाटेल अशा व्यक्तीला भाजपकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर करतो.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.