कंबोज यांचा पुन्हा इशारा! म्हणाले, “…तर मग तयार राहा. हा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी”

116

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादी असल्याचे पाहायला मिळत असून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. सर्वात पहिल्यांदा अजित पवार त्यानंतर रोहित पवार आणि आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच थेट आव्हान देणारे ट्वीट मोहीत कंबोज यांनी केले आहे.

काय केले कंबोज यांनी ट्वीट

मोहित कंबोज यांनी ‘विद्याताई चव्हाणजी को जय श्रीराम’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तासाभरातच कंबोज यांनी आणखी एक ट्वीट केले. यामध्ये कंबोज यांनी विद्या चव्हाण यांचा उल्लेख केला नसला तरी इशाऱ्याचा रोख विद्या चव्हाण यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा आहे.

या ट्विटमध्ये कंबोज यांनी असे म्हटले आहे की, लगाम दिसत नसला तरी तोंडावर तो असला पाहिजे. विनाकारण आमच्याशी वाद उकरून काढलात तर मग तयार राहा. हा फक्त एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक ट्वीट त्यांनी केले आहे. या दोन्ही ट्वीटनंतर आता मोहीत कंबोज येत्या काळात कोणता खळबळजनक दावा करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.