पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अटल-ब्रिज’चे लोकार्पण, काय आहेत वैशिष्ट्य?

138

गुजरातच्या अहमदाबाद येथे साबरमती नदीवर पादचारी आणि सायकलस्वारांसाठी बनवण्यात आलेल्या फूट ओव्हीर पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकार्पण केले. या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी बायपेयी यांचे नाव देण्यात आलेय. आकर्षक डिझाईन आणि एलईडी लाइटिंगसह, हा पूल मध्यभागी सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे. रिव्हरफ्रंटच्या पश्चिमेकडील फ्लॉवर गार्डन आणि पूर्वेकडील कला आणि संस्कृती केंद्राला जोडतो.

या लोकार्पणानंतर त्यांनी साबरमती रिव्हर-फ्रंटवर आयोजित खादी उत्सवात सहभागी होताना पंतप्रधान म्हणाले की, अटल पूल हा साबरमती नदीच्या दोन काठांनाच जोडणारा नाही, तर तो डिझाईन आणि नावीन्यपूर्ण बाबींमध्येही अभूतपूर्व आहे. गुजरातच्या प्रसिद्ध पतंग महोत्सवाचीही त्याच्या रचनेत काळजी घेण्यात आली आहे. साबरमतीचा हा किनारा आज धन्य झाला आहे. ‘इतिहास साक्षी आहे की खादीचा एक धागा स्वातंत्र्य चळवळीची शक्ती बनला. त्याने गुलामीच्या साखळ्या तोडल्या. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खादीचा हाच धागा प्रेरणास्त्रोत बनू शकतो असे मोदींनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – ‘वारणा’कडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांनी वाढ)

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ 7500 माता-भगिनींनी एकत्र चरखा चालवत सूत कताई करून नवा इतिहास रचला आहे. गांधीजींनी ज्या खादीला स्वातंत्र्य चळवळीत देशाचा स्वाभिमान बनवले. त्याच खादीला स्वातंत्र्यानंतर हीन भावनेने पाहिले गेले. त्यामुळे खादी आणि खादीशी निगडित असलेले ग्रामोद्योग पूर्णपणे नष्ट झाले. खादीची ही स्थिती विशेषतः गुजरातसाठी अतिशय वेदनादायक होती अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.

अटल पुलावर पादचाऱ्यांशिवाय सायकलस्वारही नदी ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करू शकतात. या लोकांना नदीकाठच्या मध्यापासून नदीचा किनारा पाहायला मिळेल. या पुलाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की लोक खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूंनी किंवा रिव्हरफ्रंटच्या रिसॉर्टपर्यंत जाऊ शकतात. अटल ब्रिज 2,600 मेट्रिक टन स्टील पाईप वापरून बांधण्यात आला आहे. तर छत रंगीत कापडाचे बनलेले आहे. रेलिंग काच आणि स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.