तुम्ही आयुष्यभर फक्त पुतण्या आणि मुलीलाच मोठे केले…भाजप नेत्याचा पवारांवर आरोप

जेव्हा-जेव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेव्हा-तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

70

नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाचं मोठे केले आणि जेव्हा-जेव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेव्हा-तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली, या टीकेला पडळकर यांनी उत्तर दिले.

नेमकं काय म्हणाले पडळकर?

शरद पवार यांचं ओबीसींसाठीचं प्रेम आज अचानक उफाळून आले आहे. ते कुठलंही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधी दाखवतही नाहीत, असं म्हणतात. पण मला त्यांना एकच सांगायचे आहे की, केंद्रानं ताट वाढलंय खरे आहे, तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पई-पावण्यांच्या प्रेमामुळं? पाप तुमचे आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावाने ठोकायच्या, असे म्हणत मला जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारायचे आहे की, तुम्हाला जातनिहाय जनगणनेचा डेटा कशाला हवा आहे?, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. 

(हेही वाचाः राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे… पवारांचा सल्ला)

हेच बहुजनांचे यश

जो २०११ सालचा सेन्सस अहवाल तुम्ही आता मागताय त्यातला घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहन सिंग सरकारनेच घातला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचाय आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रियाच सुरू केलेली नाही. नुसत्या भूलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलीत करायचं, ही तुमची प्रस्थापितांची करामत आज आम्हा बहुजनांना कळल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते, अशा पवारांनाच आज भूमिका मांडावी लागतेय. हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले होते पवार?

केंद्र सरकारने घटनादुरुस्ती केल्याने आता राज्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला, असं अनेकांना वाटलं. खरंतर याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. असं सांगतानाच जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधला, असा हा प्रकार असून केंद्राने ओबीसींची शुद्ध फसवणूक केली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रावर केली होती.

(हेही वाचाः राणेंनंतर आता भारती पवारही अधिकाऱ्यांवर नाराज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.