BJP Mission 48 : भाजपचे लोकसभेसाठी ‘मिशन ४८’; ‘या’ नेत्यांना दिली मतदारसंघांची जबाबदारी

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

191
भाजप

लोकसभा निवडणुकीला वर्षही बाकी राहिले नाही, त्यामुळे राज्यात सर्वात आधी भाजपने तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. कारण भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, प्रसाद लाड, धनंजय महाडिक, विनय सहस्रबुद्धे, मुरलीधर मोहोळ, राहुल कुल, महेश लांडगे यासारख्या भाजपच्या प्रसिद्ध नेत्यांवर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी, ३ जून रोजी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतही असेच निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.

(हेही वाचा Mosque : इस्लामी राष्ट्र इराणमधील 50 हजार मशिदी झाल्या बंद)

कोण कोणत्या मतदारसंघात आहेत निवडणूक प्रमुख?

  • मुंबई उत्तर – योगेश सागर
  • मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
  • मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
  • मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
  • मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
  • मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
  • ठाणे – विनय सहस्रबुद्धे
  • मावळ – प्रशांत ठाकूर
  • रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
  • कोल्हापूर – धनंजय महाडिक
  • हातकणंगले – सत्यजीत देशमुख
  • सांगली – दीपक शिंदे
  • सातारा – अतुल भोसले
  • सोलापूर – विक्रम देशमुख
  • माढा- प्रशांत परिचारक
  • जालना – विजय औताडे
  • लातूर – दिलीप देशमुख
  • छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
  • दिंडोरी – बाळासाहेब सानप
  • वर्धा – सुमीत वानखेडे
  • पुणे – मुरलीधर मोहोळ
  • बारामती – राहुल कुल
  • शिरुर – महेश लांडगे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.