‘जमत नसेल तर आराम करा, आम्हाला संधी द्या’, दरेकरांचा सेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल

133

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूरवासीय हे परिवर्तनाच्या प्रयत्नात आहेत. जमत नसेल तर आराम करा, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.

काय म्हणाले दरेकर

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपला कौल दिला असून दुसऱ्या टप्प्यात देखील आपल्याला मताधिक्य मिळेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संधी देण्यात आली होती. यासह ते पुढे असेही म्हणाले की, पोलादपूरचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा प्रयत्न करत असून महाबळेश्वर-पोलादपूर- दापोली मार्ग करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करीत पोलादपूरवासीय हे परिवर्तनाच्या प्रयत्नात आहेत. जमत नसेल तर आराम करा, आम्हाला संधी द्या असा टोला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

(हेही वाचा –अत्यंत धडाडीचे, लढाऊ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन!)

निवडणुकीची सूत्रं हाती घेत दरेकरांना धक्का

प्रवीण दरेकरांचे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई जिल्हा बँकेवरचे वर्चस्व मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोडीत काढले. आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.