शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर! म्हणाले, “तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि…”

98

शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत हात मिळवणी करत एकत्र सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर आधी पक्षातील गटनेते पद, पक्ष या पाठोपाठ थेट पक्षाच्या चिन्हावर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा देखील हायजॅक करणार असल्याच्या एकीकडे चर्चा रंगत आहेत तर दुसरीकडे भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला होता. या निशाण्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचा – राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 19 सप्टेंबरपर्यंत वाढला मुक्काम)

शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केल्यानंतर याच सामनाच्या अग्रलेखाला शेलारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. स्वतःचं अपयश झाकायला मराठी माणसाची शाल का पांघरताय…फोडा झोडा सोडा, तुमचं तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, असा हल्लाबोल शेलारांनी शिवसेनेवर केल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात शेलारांनी एक पत्र जारी केले आहे.

काय म्हटले आहे शेलारांनी पत्रात…

फाडा-झाडा साडा, तुमच मिशन मराठा माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा ! या शिर्षकाखाली आशिष शेलार यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शेलार यांनी असे म्हटले की, दुसऱ्यांना फोडा झोडा काय सांगता… पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले?
फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय?

मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट!

महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले… तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले..? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे… आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई कि विरार ? कि आणखी त्याच्यापण पुढे?

हे मिशन नव्हे “कमिशन”

कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले… बंधू” राजांनी वेगळी चूल मांडली.. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले… वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले.. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच… स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय ?
नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे!, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला चांगलेच धारेववर धरले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.