‘मै भी जिंदा हूँ’ हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंची ‘ती’ प्रतिक्रिया; आशिष शेलारांचा टोला

172
'मै भी जिंदा हूँ' हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंची 'ती' प्रतिक्रिया; आशिष शेलारांचा टोला
'मै भी जिंदा हूँ' हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंची 'ती' प्रतिक्रिया; आशिष शेलारांचा टोला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला. याच निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर सडकून टीका केली तर राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळली. राज ठाकरे अचानक भाजपविरोधात बोलल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत मै भी जिंदा हूँ हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया असल्याचे शेलार म्हणाले.

नक्की आशिष शेलार काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. मग थेट सवाल आहे त्यांना जालंधरमध्ये आम आदमी पार्टी जिंकली आणि काँग्रेस का हरली? मग राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जालंधरमध्ये चालली नाहीये का? उत्तर प्रदेश असलेल्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका, महापौर निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं, त्यावेळेस राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कुठे गेली होती? त्याच्यावर राज ठाकरे बोलतील का? मै भी जिंदा हूँ हे दाखवण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही.’

(हेही वाचा –  नाना पटोलेंच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची जबाबदारी संजय राऊतांवर? नेमकं काय घडलं? नितेश राणेंनी सांगितलं)

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“मी एका भाषणात विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो तर सत्ताधारी पक्ष हारत असतो असं म्हटलं होतं. हा स्वभावाचा, वागणुकीचा परिणाम आहे. आपलं कोण वाकडं करू शकतं अशा विचारांचा हा पराभव आहे. जनतेला, कधीही गृहित धरु नये. या निकालातून सर्वांनी हे बोध घेण्यासारखं आहे,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.

तसेच राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळत पुढे राज ठाकरे म्हणाले की, कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.