Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या बैठकीपासून संजय राऊत यांना ठेवलं लांब

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी पक्षातील नेते एकमेकांवरच टीका करत होते.

44
Sanjay Raut
Sanjay Raut : विधानसभा अध्यक्षांचा अपमान; संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल आणि कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. अशातच रविवार १४ मे रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडी पक्षाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आमंत्रण नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला विषय मिळाला आहे.

(हेही वाचा – Nitesh Rane : संजय राऊत येत्या तीन महिन्यात तुरुंगात जाणार – नितेश राणे)

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी पक्षातील नेते एकमेकांवरच टीका करत होते. त्यामुळे वज्रमूठ सैल होतांना दिसत होती. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामानाच्या अग्रलेखामधून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अशातच संजय राऊत या बैठकीसाठी उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही पहा – 

‘आगामी निवडणूक’ हा या बैठकीचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. आता या बैठकीमध्ये अजून कुठल्या गोष्टींवर चर्चा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Sanjay Raut)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.