Loksabha Election 2024 : भाजपाने कोणाचा केला पत्ता कट? वाचा कोणाला मिळाली संधी…

Loksabha Election 2024 : भाजपाने महाराष्ट्रात संधी नाकारलेल्यांमध्ये भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

289
Loksabha Election 2024 : भाजपाने कोणाचा केला पत्ता कट? वाचा कोणाला मिळाली संधी...
Loksabha Election 2024 : भाजपाने कोणाचा केला पत्ता कट? वाचा कोणाला मिळाली संधी...

भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने १३ मार्च रोजी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील एकूण 72 उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. यात भाजपाने काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपाची ११ राज्यांतील ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; मनोहरलाल खट्टर यांना कर्नालमधून उमेदवारी)

या उमेदवारांना नाकारली उमेदवारी

भाजपाने महाराष्ट्रात संधी नाकारलेल्यांमध्ये भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तिकीट दिले आहे. त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापले गेले आहे. ‘५ वर्षे वनवास खूप झाला’, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

भाजपचा बालेकिल्ला धक्कातंत्र

जळगाव मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्या भाजपाचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच मानला जातो.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : नागपूरमधून नितीन गडकरीच, तर बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी; भाजपाची दुसरी यादी जाहीर)

या चेहऱ्यांना लोकसभेसाठी मिळाली नव्याने संधी

महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या यादीमध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अकोल्यातून अनुप धोत्रे, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जळगावमधून स्मिता वाघ, उत्तर पूर्व मुंबई मिहीर कोटेचा या उमेदवारांना नव्याने संधी देण्यात आली आहे. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.