BJP Candidate List : मुंबईतल्या १४ जागांवर भाजपाचे ‘हे’ उमेदवार ठरले; जाणून घ्या त्यांची नावे

217
BJP Candidate List : मुंबईतल्या १४ जागांवर भाजपाचे ‘हे’ उमेदवार ठरले; जाणून घ्या त्यांची नावे
BJP Candidate List : मुंबईतल्या १४ जागांवर भाजपाचे ‘हे’ उमेदवार ठरले; जाणून घ्या त्यांची नावे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापैकी ६ जागा एसटीसाठी आणि ४ जागा एससीसाठी आहेत. तर १३ जागांवर महिलांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. त्यात भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) लढवणारे ११ जण आहेत. तसेच या यादीत मुंबईतल्या १४ जागांवरही भाजपाने (BJP Mumbai Candidate List) त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर आशिष शेलार (Ashish Shelar) आणि विनोद शेलार या दोन्ही बंधूंना भाजपाने निवडणूकीत संधी दिली आहे. (BJP Candidate List)

मुंबईतल्या या १४ जागांवरील उमेदवार कोण?

दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विलेपार्ले – पराग आळवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर

(हेही वाचा – आदिवासी महिलेने PM Narendra Modi यांना १०० रुपये का पाठवले ? खुद्द मोदी यांनीच सांगितले कारण…)

दरम्यान, भाजपाने बोरिवली येथील आमदार सुनील राणे, वर्सोवा येथील भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्व येथील पराग शाह या ३ विद्यमान आमदारांना प्रतिक्षेत ठेवले आहे. (BJP Candidate List)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.