BJP : वसुंधरा राजे झालरपाटण मधून लढणार; भाजपची दुसरी यादी जाहीर

भाजपने या यादीत १० महिलांना तिकीट दिले आहे. याशिवाय, माजी मंत्र्यांवरही पक्षाने डाव खेळला आहे.

57
BJP : वसुंधरा राजे झालरपाटण मधून लढणार; भाजपची दुसरी यादी जाहीर
BJP : वसुंधरा राजे झालरपाटण मधून लढणार; भाजपची दुसरी यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाने शनिवारी (२१ ऑक्टोबर) राजस्थान विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह ८३ उमेदवारांचा समावेश आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीतील भाजपची बहुप्रतिक्षित दुसरी यादी आज जाहीर झाली आहे. यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि माजी उपराष्ट्रपती भैरोंसिंग शेखावत यांच्या जावयाचा समावेश आहे. भाजपने या यादीत १० महिलांना तिकीट दिले आहे. याशिवाय, माजी मंत्र्यांवरही पक्षाने डाव खेळला आहे. (BJP)

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे झालरापाटण या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातूनच लढणार आहेत. मात्र, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांना चुरूऐवजी तारानगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, राठोड यांनी यापूर्वी तारानगरमधून निवडणूक लढवली होती. माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांचे जावई आणि सध्या जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघाचे आमदार नरपत सिंग राजवी यांची नाराजी सुध्दा पक्षाने दूर केली आहे. (BJP)

राजवी यांना आता चित्तोडगडमधून तिकीट देण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीत त्यांचे तिकीट कापून राजसमंदच्या खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी दिली होती. भाजपने यापूर्वी ९ ऑक्टोबरला विधानसभेच्या ४१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. उदयपूर राजघराण्याचे सदस्य विश्वराज सिंह मेवाड यांना नाथद्वारामधून तिकीट देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी नाथद्वारा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. (BJP)

वसुंधरा गटाच्या ११ आमदारांना तिकीट

भाजपच्या ८३ उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत १० महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर वसुंधरा गटाच्या डझनभर आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. यात मालवीय नगरमधून कालीचरण सराफ, कोटामधून प्रतापसिंग सिंघवी, संगरियामधून गुरदीपसिंग शाहपिनी, निंबाहेरामधून श्रीचंद कृपलानी, नौहरमधून अभिषेक मटोरिया, सूरजगढमधून संतोष अहलावत, दागमधून कालुलाल मेघवाल, खानपूरमधून नरेंद्र नागर, मनोहरथानामधून गोविंद राणीपुरीया, नीमकठाणामधून प्रेमसिंग बजौर आणि बागरूमधून कैलाशचंद वर्मा यांचा समावेश आहे. (BJP)

(हेही वाचा – Indian Navy: युद्धनौका ‘इंम्फाळ’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल !

झुंझुनूचे माजी खासदार संतोष अहलावत यांना सूरजगड मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. यावेळी ते म्हणाले होते की, वाईट दिवस आले आहेत तर कधीतरी चांगले दिवस सुध्दा येतील. पक्षाने त्यांना आता विधानसभेच्या मैदानात उतरविले आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योती मिर्धा यांना पक्षाने नागौरमधून उमेदवारी दिली आहे. भाजपने दुसऱ्या यादीत ५६ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे. तर पक्षाने ७ आमदारांची तिकिटे कापली आहे. या यादीत २७ अशा जागा आहेत जेथे २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. यात सूरसागर, सांगानेर, चित्तोडगड, सूरजगड, नागौर, मकराना आणि बडी सदरी या मतदारसंघाचा समावेश आहे. (BJP)

दुसऱ्या यादीत भाजपने अनेक माजी मंत्र्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. यात प्रताप सिंग सिंघवी, श्रीचंद कृपलानी, नरपत सिंग राजवी, ओतराम देवासी, पुष्पेंद्र सिंह राणौत, अनिता भदेल, वासुदेव देवनानी, कैचरण सराफ, राजेंद्र राठोड यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे. तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत राजे यांचे नाव नव्हते. यामुळे त्यांना तिकीट मिळणार की नाही? आणि मिळाली तर कुठून मिळणार? असे विविध प्रश्न निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर, राजे यांना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात लढविण्याचा हायकमांडचा विचार असल्याची चर्चा सुध्दा रंगली होती. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.