Indian Navy: युद्धनौका ‘इंम्फाळ’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल !

ही विनाशिका एकूण 312 कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकते, त्याची क्षमता 4000 नॉटिकल मैल आहे

27
Indian Navy: युद्धनौका 'इंम्फाळ' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल !
Indian Navy: युद्धनौका 'इंम्फाळ' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल !

भारतात अग्निपथ योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत भारतीय नौदलात प्रथमच महिला खलाशांची भरती करण्यात आली. याअंतर्गत महिला खलाशांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था असलेली युद्धनौका तयार करण्यात आली. शुक्रवारी इम्फाळ म्हणजे यार्ड १२७०६ येथे हे प्रोजेक्ट १५बी वर्गातील गाईडेड मिसाईल (Imphal) प्रणालीयुक्त तिसरी विनाशिका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) आज भारतीय नौदलाकडे (Indian Navy) ही युद्धनौका आज पाठवण्यात आली.

युद्धनौकेचे वैशिष्ट्य…
भारतात बांधलेल्या सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक असून याची बांधणी DMR249Au हे स्वदेशी पोलाद वापरून केली आहे. या जहाजाची एकूण लांबी १६४ मीटर आहे आणि वजन ७४०० पेक्षा जास्त आहे. सागरी युद्ध क्षमतेचा विचार करता युद्धातील विविध मोहिमा आणि डावपेच बघता हे जहाज लक्षणीयरित्या सक्षम आहे. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘बराक – ८’ या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. याशिवाय स्वदेशी पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्स यामध्ये बसवलेले आहेत.

इंफाळची क्षमता
नौदलातील आधीच्या विनाशिका आणि युद्धनौकांच्या क्षमतांपेक्षा ही लक्षणीयरित्या अधिक अष्टपैलू आहे. शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांविरुद्ध इंफाळची सर्वांगीण क्षमता ही जहाजांच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे कार्य करण्यास आणि नौदल कृती दलाच्या प्रमुखांनाही कार्य करण्यास सक्षम ठरेल.
‘इंफाळ’ही आजपर्यंतची सर्वात अधिक लढाऊ क्षमतेची विनाशिका असून ती करारातील वेळेच्या चार महिने आधीच भारतीय नौदलाला देण्यात आली आहे. हे एम डी एल च्या कार्यातील सातत्यपूर्ण सुधारणा आणि जागतिक मानदंडांच्या तोडीस तोड कार्य करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या जहाजाने 03 सीएसटी (कॉन्ट्रॅक्टर्स सी ट्रायल) मध्ये पहिल्याच सीएसटीमध्ये प्रमुख शस्त्रास्त्रांच्या फैरींसह सर्व सागरी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

(हेही वाचा – Monsoon Update : देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रात ११.४ टक्के कमी पाऊस )

लांब पल्ल्याची आणि जमिनीवर हल्ला करण्याची दुहेरी भूमिका
हे जहाज सर्व P15B जहाजांपैकी पहिले जहाज आहे. याची सुधारित क्षमता जास्त आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमध्ये लांब पल्ल्याची आणि जमिनीवर हल्ला करण्याची दुहेरी भूमिका निभावण्याची क्षमता आहे तसेच इंफाळ ही पहिली नौदल युद्धनौका आहे. ज्यामध्ये महिला अधिकारी आणि खलाशांच्या निवासाची सोय आहे. ही विनाशिका एकूण 312 कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकते, त्याची क्षमता 4000 नॉटिकल मैल आहे आणि ती नियोजित मोहिमेपेक्षा विस्तारित मोहिम वेळेसह ठराविक 42 दिवसांची मोहीम पार पाडू शकते. विनाशिकेची पोहोच आणखी वाढवण्यासाठी त्यावर दोन हेलिकॉप्टर आहेत. जहाज एका शक्तिशाली कम्बाइंड गॅस अँड गॅस प्रोपल्शन प्लांट (COGAG) द्वारे चालवले जाते, ज्यामध्ये चार उलट करता येण्याजोग्या गॅस टर्बाइनचा समावेश आहे, ज्यामुळे तिला 30 नॉटिकल मैल (अंदाजे 55 किमी प्रतितास) पेक्षा जास्त वेग गाठता येतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.