Bihar Political Crisis : पाटण्यात बैठकांचे सत्र, नितीशकुमार आज राजीनामा देणार ?

आज म्हणजेच रविवार, २८ जानेवारी हा बिहारच्या राजकारणासाठी एक मोठा दिवस ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपला राजीनामा देऊन संध्याकाळी पाच वाजता भाजपसोबत नवीन सरकार स्थापन करून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

136
Bihar Political Crisis : पाटण्यात बैठकांचे सत्र, नितीशकुमार आज राजीनामा देणार ?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार (Bihar Political Crisis) रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री नितीश कुमार आपला राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे अशी माहिती प्रदेश अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी दिली आहे. आधी नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर भाजप आपली भूमिका जाहीर करेल, असे चौधरी म्हणाले.

(हेही वाचा – Gyanvapi Mosque: ज्ञानवापीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अहवालातून मोठी माहिती उघड, १५ शिवलिंगे आणि विविध काळातील ९३ नाणी सापडली)

मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला – 

तसेच एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे की, बिहारचे (Bihar Political Crisis) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपालांशी भेटण्याची वेळ मागितली आहे.

(हेही वाचा – IRCTC: १८ दिवसांची ‘रामायण यात्रा’ करा; देशभरातील प्रभु रामाशी संबंधित तीर्थक्षेत्रे पाहण्याची संधी मिळवा; वाचा आयआरसीटीसीचे नियम)

जे. पी. नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Political Crisis) रविवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जेडीयूच्या आमदारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. यानंतर ते राजभवनात जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करू शकतात आणि संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन होऊ शकते. नितीश कुमार यांच्यासोबतच भाजपशासित दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेतली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Bihar Political Crisis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.