Madhya Pradesh Election : ‘हे’ नेते स्वतःच्याच मुलांना सेट करण्याच्या नादात काँग्रेसच्या नेत्यांबद्दल काय म्हणाले मोदी

117
Madhya Pradesh Election : 'हे' नेते स्वतःच्याच मुलांना सेट करण्याच्या नादात काँग्रेसच्या नेत्यांबद्दल काय म्हणाले मोदी
Madhya Pradesh Election : 'हे' नेते स्वतःच्याच मुलांना सेट करण्याच्या नादात काँग्रेसच्या नेत्यांबद्दल काय म्हणाले मोदी

मध्य प्रदेशात काँग्रेस बिलकुलच निवडणूक लढवत नाही आहे. तर त्यांचे नेते स्वतःच्या मुलांनाच सेट करण्याच्या नादात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचार सभेत काँग्रेसला लगावला.(Madhya Pradesh Election)

विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये मोठी गर्दी जमत आहे. अशाच एका प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमध्ये गटबाजीवर जोरदार प्रहार केला. तर यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मध्य प्रदेशात आपली डाळ शिजणार नाही. भाजपचे सरकार येणार आहे. मध्य प्रदेश मधले काँग्रेसचे दोन बडे नेते आपापल्या मुलांची राजकीय प्यादी पुढे सरकवण्याच्या नादात आहेत. त्यांना मध्य प्रदेशात काँग्रेसला जिंकून आणायचे नाही, तर आपापल्या मुलांकडे मध्य प्रदेश काँग्रेसचा कब्जा द्यायचा आहे.

(हेही वाचा : Virar : दोन फ्लॅट तब्बल १५० जणांना विकले; बिल्डरचा फसवणुकीचा पराक्रम)

मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह आपापल्या मुलांना मुलांची राजकीय प्यादी पुढे सरकवण्याच्या नादाला लागले आहेत. कमलनाथ यांना आपला मुलगा नकुल नाथ याला मुख्यमंत्री बनवायचे आहे, तर दिग्विजय सिंह यांना आपला मुलगा जयवर्धन सिंह याला मुख्यमंत्री करायचे आहे. पण काँग्रेस हायकमांड या दोन्ही नेत्यांच्या आग्रही मागण्यांना ताकास तूर लागू देत नाही. याचाच बोचरा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला टोला हाणला आहे. २०१४ पूर्वी काँग्रेसचा प्रत्येक घोटाळा लाखो कोटींचा असायचा, आता भाजप सरकारमध्ये एकही घोटाळा नाही. गरिबांच्या हक्कासाठी आपण वाचवलेला पैसा आता गरिबांच्या रेशनवर खर्च होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.