Virar : दोन फ्लॅट तब्बल १५० जणांना विकले; बिल्डरचा फसवणुकीचा पराक्रम

127
CBI : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ८ जणांना CBI कडून अटक

विरार (Virar) मध्ये निवासी प्रकल्प असलेल्या बंगळुरू येथील एका बिल्डरला दोन फ्लॅट तब्बल १५० खरेदीदारांना विकून त्यांची ३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याशिवाय तिसरा फ्लॅटही अशाच प्रकारे विकला गेला आहे का?, याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याप्रकरणी मंदार हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक राजू सुलिरे याला मीरा भाईंदर वसई विरार  (Virar) आयुक्तालयाच्या क्राईम युनिट 3 ने बेंगळुरू येथून अटक केली आहे. तसेच, त्याचे साथीदार अविनाश ढोले, विपुल पाटील, अल्लाउद्दीन शेख, युसूफ खोतवाला आदी फरार आहेत. कंपनीचे विरार आणि नालासोपारा येथे निवासी प्रकल्प आहेत.

(हेही वाचा High Court : गुजरात उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले; तुम्ही स्वतःला देव किंवा राजे समजता का?)

2011 ते 2018 दरम्यान 150 हून अधिक ग्राहकांची फसवणूक झाली. या फसवणुकीच्या तक्रारी विरार (पश्चिम) येथील अर्नाळा पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या. बाजारभावापेक्षा कमी किमतीत सदनिका देण्याचा दावा आरोपींनी केला होता. आरोपींनी संभाव्य खरेदीदारांना फ्लॅट दाखवले आणि विक्रीचे करारही केले. एक फ्लॅट अनेक खरेदीदारांना विकल्याचे तपासात समोर आले आहे. सदनिकांचा ताबा देण्यास विलंब झाल्यास व्याज देण्याचे आश्वासन देऊन ग्राहकांना विश्वासात संपादन केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.