Bhavana Gawli : वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही; राजकारणात काही कटू निर्णय घ्यावे लागतात.

195
Bhavana Gawali : वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
Bhavana Gawali : वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

शिंदे गटाच्या नेत्या वाशिम – यवतमाळ लोकसभा (Washim yavatmal lok sabha 2024) मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)यांना २०२४ च्या लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मागील ५ टर्म निवडून आलेल्या गवळी यांनी त्या पक्षावर नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. परिणामी मुख्यमंत्री शिंदे यांनी गवळी यांना वाऱ्यांवर सोडणार नसल्याची ग्वाही दिली आहे. (Bhavana Gawli)

(हेही वाचा – Sandeshkhali Calcutta HC : प्रशासन आणि सत्ताधारी 100 टक्के जबाबदार; संदेशखाली प्रकरणी न्यायालयाने ओढले ताशेरे

गवळी यांनी उमेदवारीसाठी बरेच केले प्रयत्न 

शिवसेनेने (Shivsena) केलेल्या सर्वेक्षणात भावना गवळी यांच्याविषयी चांगले मत आले नसल्याच्या चर्चा माध्यमांत रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांचे तिकिट कापले जाईल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भावना गवळी बरेच प्रयत्न करतांना दिसून येत होत्या. त्यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचीही भेट घेतली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. ‘सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते’, असे भावना गवळी यांचे म्हणणे होते. असे असूनही राजश्री पाटील यांना यवतमाळची उमेदवारी देण्यात आली आहे. (Bhavana Gawli)

(हेही वाचा – Goregaon Dumping Ground : गोरेगाव पूर्वेला उभे राहतेय अनधिकृत डेब्रीजचे डम्पिंग ग्राऊंड)

शिंदेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला 

राजश्री पाटील (Rajshree Patil) यांनी ४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. गवळी यांचे तिकीट कापल्यामुळे राजश्री पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल करताना भावना गवळी गैरहजर राहिल्या. अर्ज भरताना संजय राठोड यांच्यासह, मदन येरावर, दादा भुसे आदी आमदार उपस्थित होते. (Bhavana Gawli)

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषाने माहिमचे सिटीलाईट सिनेमागृह दुमदुमले)

शिंदेंनी गवळीना केला उद्देश

राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, आयोजित सभेत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी भावना गवळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राजकारणात असे कटू निर्णय घ्यावे लागतात; पण कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे विधान एकनाथ शिंदे यांनी भावना गवळींना उद्देशून केले. (Bhavana Gawli)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.