भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी : राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

77

भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची १६ ऑगस्ट रोजी तिसरी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील अटल स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेही उपस्थिती होते.

भारत हा केवळ जमिनीचा तुकडा नसून एक जिवंत अस्तित्व आहे, असे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे, अटल बिहारी वाजपेयी हे आमच्या पिढीसाठी दूरदृष्टी असलेले, ओजस्वी वक्ता, विद्वान साहित्यकार, राष्ट्रवादी विचारांचे होते, अटल बिहार वाजपेयी यांनी त्यांचे सर्व जीवन राष्ट्रासाठी निःस्वार्थ सेवेसाठी समर्पित केले, असे उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.

(हेही वाचा : तालिबानची दहशत: अमेरिकन म्हणतायेत ‘कम बॅक डोनाल्ड ट्रम्प’!)

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहार वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले कि, अटल बिहारी वाजपेयी हे आम्हाला एक प्रेमळ, मायेची उब देणारे व्यक्तीमत्व म्हणून आठवते. त्यांचा प्रेमळ स्वभाव, विनोदी बुद्धीही आठवते. त्यांनी राष्ट्राच्या प्रगतीमध्ये दिलेले योगदान याचेही आम्हाला स्मरण आहे. अटलजी नागरिकांच्या हृदयात आणि मनात राहतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.