मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले मंत्री; काय जादू झाली? वाचा सविस्तर…

136
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले मंत्री; काय जादू झाली? वाचा सविस्तर...
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले मंत्री; काय जादू झाली? वाचा सविस्तर...

शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सातत्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांना विस्ताराआधीच मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यांना दिव्यांग मंत्रालयाच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने येत्या जून महिन्यात ‘दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्षपद आणि प्रमुख मार्गदर्शकपदी बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बच्चू कडू यांना या समितीच्या अध्यक्षपदासाठी मंत्र्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत मविआतील जागा वाटपावर झाली चर्चा)

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील दिव्यांगांची संख्या २९ लाख ६३ हजार ३९२ इतकी आहे. मात्र दिव्यांगाना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा लाभ अनेकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांगाना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे जात प्रमाणपत्र, व अन्य आवश्यक ती प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांना ने-आण करण्याची व्यवस्था उभी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे बंधनकारक करण्यात आले आहे. या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

…अखेर जेवणाचं आमंत्रण मिळालं

जेवणाचं आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसतं. घोडा मैदान जवळच आहे, ही लढाई आहे. मंत्री नाही झालो तरी कामं करतोय. मंत्री झालो तर अधिक वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार तातडीने होणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं गरजेचं आहे, ही जनतेची खरी मागणी आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे कडू यांना अखेर जेवणाचं आमंत्रण मिळाल्याच्या चर्चा आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.