चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसलेंवर हल्ला

193

चिंचवड पोटनिवडणुकीतील मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या बुधवारी प्रचारादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात भोसले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली सध्या त्यांच्या चिंचवड येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी सायंकाळी नाना काटे यांचा सचिन भोसलेंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेरगाव परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करत होते. त्यादरम्यान काही अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि भोसलेंसह कार्यकर्त्यांना मारहाण करू लागले. यावेळी भोसले यांच्यावर ब्लेडने देखील वार केल्याची माहिती मिळत आले. ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे घडली. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे.

(हेही वाचा – राऊतांचा कांगावा उघड; आता त्यांच्याविरोधात होणार गुन्हा दाखल; नरेश म्हस्केंनी दिली माहिती)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.