प्रतिनिधी
भोंदूगिरी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाने महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, तपासात एकापेक्षा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. केवळ महिलांची फसवणूक आणि अत्याचार इथपर्यंतच खरात मर्यादित नव्हता, तर तो चक्क आंतरराष्ट्रीय ‘हवाला’ रॅकेट चालवत असल्याचे खळबळजनक वास्तव उघड झाले आहे. परदेशात, विशेषतः दुबईत मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खरात या मार्गाचा वापर करत होता, अशी माहिती एसआयटीच्या (SIT) तपासात पुढे आली आहे.(Ashok Kharat)
मिळालेल्या माहितीनुसार, खरातचे जाळे केवळ सर्वसामान्यांपर्यंतच नाही, तर काही बडे राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पसरले होते. हे ‘बडे भक्त’ त्याला हवाल्याच्या व्यवहारात मदत करत असल्याचा संशय बळावला आहे. एसआयटीला या संदर्भात सबळ पुरावे मिळाले असून, आता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची शक्यता आहे. यामुळे खरातच्या अडचणीत प्रचंड वाढ होणार आहे.(Ashok Kharat)
(हेही वाचा – Electricity bill reduced : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; घरगुती वीजदरात होणार कपात; नवे दर एप्रिलपासून होणार लागू )
”मी महादेवाचा अवतार…” म्हणत लैंगिक अत्याचार
अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीसोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी ती खरातकडे गेली असता त्याने तिला गाठले. “मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तुझी संकटे दूर होतील आणि नकार दिल्यास तुझ्या पतीचा व मुलाचा मृत्यू होईल,” अशी भीती घालून त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. खरातने बहुतांश महिलांना याच एका ‘मोडस ऑपरेंडी’ने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.(Ashok Kharat)
गुन्ह्यांचे ‘शतक’ पार करण्याची शक्यता?
खरात विरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषणाचे तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. नेवासा येथील एका व्यावसायिकाला ‘व्यापारात बरकत’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांच्या अंगठ्या विकून फसवणूक केल्याचाही गुन्हा यात सामील आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस हेल्पलाईनवर खरात विरोधात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या महिला आणि पुरुषांची फसवणूक झाली आहे, त्यांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.(Ashok Kharat)
सध्या खरात एसआयटीच्या कोठडीत असून, त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील रेकॉर्डिंगमधून अनेक बड्या नावांचे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘हवाला’ रॅकेटच्या माध्यमातून त्याने किती काळा पैसा पांढरा केला आणि त्यामागे कोणती राजकीय शक्ती होती, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.(Ashok Kharat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

