Sanjay Raut : संजय राऊतांना आता अशोक चव्हाणांनीही सुनावले; म्हणाले… 

नाना पटोले यांना त्यांचा काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही, असे संजय राऊत म्हणाले होते.

162
संजय राऊतांना आता अशोक चव्हाणांनीही सुनावले
जय राऊतांना आता अशोक चव्हाणांनीही सुनावले

जसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून संजय राऊत माध्यमांशी बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादीवर भाष्य करू लागले आहेत, मात्र यावेळी या दोन्ही पक्षांचे नेते संजय राऊत यांना थेट सुनावत आहेत.

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात काय वाद झाला?

संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करु नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपासोबत जाण्याची चूक करेल असे वाटत नाही. शरद पवार हे फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार मानणारे आहेत. त्यामुळे ते भाजपासोबत जाणार नाहीत असा आमचा विश्वास आहे असे नाना पटोले यांनी म्हटले, तसेच संजय राऊत यांनी चोंबडेपणा करु नये. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत असेही त्यांनी सुनावले.

संजय राऊत यांनी नेमके काय उत्तर दिले?

यानंतर संजय राऊत यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले. नाना पटोलेंना त्यांचा काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही. नाना पटोलेंपेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात. यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना सुनावले.

(हेही वाचा NCP : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप )

काय म्हणाले अशोक चव्हाण?

तीन पक्षांची आघाडी असल्याने काहीवेळा शाब्दिक खटके उडतात. मात्र नाना पटोलेंना पक्ष गांभीर्याने घेत नाही असे म्हणता येणार नाही. नाना पटोले हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी एकमेकांविषयी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आम्ही टोकाला जाणार नाही अशा पद्धतीने वक्तव्ये केली पाहिजे.

वाद कशामुळे वाढला? 

राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व बदलाच्या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब घेत असतात, त्यामुळे नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.