Rajya Sabha Elections : भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुळकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी

गुजरातमधून नड्डा तर ओडिशातून अश्विनी वैष्णव यांना तिकीट

252
Rajya Sabha Elections : भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुळकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) १२ उमेदवारांची नावे जाहीर केली. तर, कॉंग्रेसने सुध्दा चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाने बुधावारी (१४ फेब्रुवारी) राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha Elections) पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना राज्यसभेचे तिकीट दिले आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. (Rajya Sabha Elections)

भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) यांना गुजरातमधून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले जाणार आहे. भाजपने (BJP) आज उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. यात मध्यप्रदेश आणि गुजरातमधून प्रत्येकी चार, महाराष्ट्रातून तीन आणि ओडिशामधून एक नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Rajya Sabha Elections)

(हेही वाचा – State Reserve Police Force : राज्य राखीव पोलीस दलात कसे सामील व्हावे, जाणून घ्या…)

महाराष्ट्रातून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या व्यतिरिक्त मेधा कुळकर्णी (Medha Kulkarni) आणि डॉ. अजीत गोपछडे (Dr. Ajit Gopchde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि जशवंतसिंग परमार यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातून डॉ. एल मुरूगन, उमेशनाथ महाराज, माया नारोलिया आणि बंसीलाल गुर्जर यांचा समावेश आहे. ओडिशातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Rajya Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.