Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नेते भगवंत मान यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

136
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नेते भगवंत मान यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नेते भगवंत मान यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी सोमवार, 12 जानेवारी रोजी अयोध्येत (Ayodhya) जाऊन रामललाचे दर्शन घेतले. दोन्ही नेत्यांनी राम मंदिरातील (Ayodhya Ram mandir) विशेष प्रार्थनेतही भाग घेतला. बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी राम मंदिराचे वर्णन अतिशय सुंदर आणि भव्य असून येथे आल्यावर मला आनंद झाल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Online Shopping Fraud : सोशल मीडियावरील फसव्या जाहिराती आणि ग्राहकांची लूट)

उत्तरप्रदेशच्या मंत्रीमंडळानेही घेतले दर्शन

आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party, आप) नेत्यांच्या अयोध्या भेटीपूर्वी एक दिवस आधी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), त्यांच्या सरकारचे मंत्री आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील 325 हून अधिक सदस्यांनी रविवारी मंदिराला भेट दिली होती. यात समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party, एसपी) सदस्य सहभागी झाला नव्हता.

गेल्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्मित राम मंदिरात भगवान श्री राम ‘श्री रामलला’ या बालस्वरूपाचा अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भाविकांच्या प्रचंड गर्दीबरोबरच विविध राज्यांतील राजकीय व्यक्ती आणि मान्यवर मंडळी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.