Anurag Thakur : पराभवानंतर ते हिंदु धर्माचा अपमान करतात; अनुराग ठाकूर यांनी उघड केली काँग्रेसची मानसिकता

165
Anurag Thakur : पराभवानंतर ते हिंदु धर्माचा अपमान करतात; अनुराग ठाकूर यांनी उघड केली काँग्रेसची मानसिकता
Anurag Thakur : पराभवानंतर ते हिंदु धर्माचा अपमान करतात; अनुराग ठाकूर यांनी उघड केली काँग्रेसची मानसिकता

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election 2023) जाहीर झाला. चार राज्यांत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, तर तेलंगणात काँग्रेस (Congress) बहुमताने सत्तेत आली. या निकालानंतर काही नेत्यांनी EVM चा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला, तर काही नेत्यांनी धार्मिक टीका केली. यावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

(हेही वाचा – Forbes 2023 : ‘फोर्ब्स’कडून शक्तिशाली महिलांची यादी जाहीर, ‘या’ भाजप नेत्यासह ३ भारतीय महिलांना मिळाला मान)

त्यांना संस्कृती नष्ट करायची आहे

काँग्रेसवर आरोप करताना अनुराग ठाकूर म्हणाले, ”यातून त्यांची विचारसरणी स्पष्टपणे दिसते. त्यांना देशाची संस्कृती आणि अस्मिता नष्ट करायची आहे. तुकडे तुकडे गँगसोबत काही लोक उभे आहेत, मात्र आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही. त्यांची विचारसरणी फक्त हिंदुत्व (Hindutv) आणि सनातन धर्माचा (Sanatan Dharma) अवमान करणारी आहे.’

घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही

‘दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्यासह अनेक विरोधी नेते ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही. पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही, फक्त ईव्हीएमला दोष देतात. ते फक्त हिंदू (Hindu) आणि सनातन धर्माला (Sanatan Dharma) लक्ष्य करतात. यातून त्यांची मानसिकता दिसून येते,’ अशी टीका ठाकूर यांनी यावेळी केली.

(हेही वाचा – Ayodhya Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कारसेवकांच्या कुटुंबियांनाही निमंत्रण; विविध क्षेत्रांतील 7000 मान्यवर निमंत्रित)

तेलंगाणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्याविषयी ठाकूर म्हणाले, ”तेलंगणाच्या भावी मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी केले होते, ज्यात त्यांनी तेलंगणाचा डीएनए बिहारच्या डीएनएपेक्षा चांगला आहे, असे म्हटले होते. सनातन धर्म (Sanatan Dharma), हिंदू (Hindu) आणि हिंदी भाषिक लोकांविरुद्ध तर द्रमुक (DMK) नेत्यांचे षड्यंत्र सर्वांनाच ज्ञात आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.