NCP : आगामी निवडणुकीची स्ट्रॅटजी ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे सुरू

सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि विधानसभा क्षेत्र निहाय इतर पक्षांचे कोणते संभाव्य उमेदवार उभे राहू शकतात आणि त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याची रणनीती ठरवली जाणार आहे.

140
NCP च्यावतीने १८ फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा
NCP च्यावतीने १८ फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा

याचवर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींना समोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अजित पवार गटाने (Ajit Pawar group) एक गुप्त अंतर्गत सर्व्हे सुरू केला आहे. या सर्वेच्या माध्यमातून लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Assembly) निहाय पक्षाची स्थिती काय आहे? पक्षा बद्दल जनमानसात काय भावना आहे? कोणत्या विषयांना घेऊन पक्षाने पुढे निघावं? सध्या असलेले लोकप्रतिनिधी जनमानसात किती लोकप्रिय आहेत? याबद्दलचा एक गुप्त सर्व्हे पक्षाच्या वतीने केला जात आहे. (NCP)

या सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Assembly) क्षेत्र निहाय इतर पक्षांचे कोणते संभाव्य उमेदवार उभे राहू शकतात आणि त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याची रणनीती ठरवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पक्षाबद्दल जनसामान्य व्यक्ती काय विचार करतो याबद्दल देखील या सर्व्हेमध्ये माहिती घेतली जात असल्याचे समोर येत आहे. (NCP)

(हेही वाचा – Devendra Fadnvis : ‘हे मालदीव नव्हे… तर कोकण आहे’; देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले ‘या’ बीचचे फोटो)

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून अंतर्गत सर्व्हे केले जातात. त्याचा फायदा पक्षाला येणाऱ्या निवडणुकांच्या काळात स्टेटस ठेवण्यासाठी होत असतो. परंतु याचे निकालच या सर्वांचा किती फायदा झाला हे सांगून जातात. परंतु अशा प्रकारच्या सर्व मुळे पक्षाच्या वरिष्ठांना ग्राउंड लेव्हलला काय चालले आहे याची माहिती नक्कीच मिळत राहते आणि त्यानुसारच पक्षश्रेष्ठी हे निवडणुकीची रणनीती ठरवत असतात. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.