Amit Shah : “हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून…” ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

Amit Shah : "हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून..." ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

96
Amit Shah :
Amit Shah : "हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून..." ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करून 26 जणांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शाहांनी पाकड्यांना इशारा दिला आहे. (Amit Shah)

” पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात प्रत्येत दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू , पहलगामच्या दोषींना सोडणार नाही, सूड घेतला जाईल . दहशतवाद्यांच्या आकांनाही आता सोडणार नाही.” असा सज्जड इशारा अमित शाह यांनी दिला. दहशतवादाविरुद्ध आमचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. (Amit Shah)

दहशतवाद मुळापासून उखडून फेकू

“काश्मीरमध्ये ९० च्या दशकापासून दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण सुरूच आहे. आपल्या 26 लोकांना मारून ते त्यांचे ध्येय साध्य करतील असं त्यांनी समजू नये. एखादी भ्याड कृती करून आपला विजय झाला, असं जर कोणी समजत असेल तर मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, हे नरेंद्र मोदी सरकार आहे, आम्ही कोणालाच सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. देशातील प्रत्येक इंचा-इंचातून आम्ही दहशतवाद मुळापासून उखडून फेकू, दहशतवाद संपवू. ” असा इशारा अमित शाह यांनी दिला. (Amit Shah)

शिक्षा मिळणारच

हा लढाईचा अंत नाही, सुरूवात आहे, असे ते पुढे म्हणाले. दहशतवाद पसरवणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छितो की, त्यांना वेचून-वेचून शोधून काढू आणि उत्त देऊ. कोणालाही सोडले जाणार नाही. जोपर्यंत दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना याची शिक्षा मिळणारच”, असा थेट इशारा अमित शाह यांनी पुन्हा दिला. (Amit Shah)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.