Amit Shah : “मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील”- अमित शहा यांची भविष्यवाणी

आगामी 2024 मध्ये 300 जागांसह नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. यापूर्वी देखील आसाममध्येच भाजपच्या दिब्रूगढ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात त्यांनी याचा पहिल्यांदा उच्चार केला होता.

101
Amit Shah : "मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील"- अमित शहा यांची भविष्यवाणी

नुकताच अमित शहा (Amit Shah) यांनी एक भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच भाजप तीनशेहून अधिक जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केला. आसाममधील आयोजित सभेत अमित शाह बोलत होते.

आगामी 2024 मध्ये 300 जागांसह नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. यापूर्वी देखील आसाममध्येच भाजपच्या दिब्रूगढ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात त्यांनी याचा पहिल्यांदा उच्चार केला होता. लोकसभेला आसाममधून भाजप 12 ते 14 जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला होता. ईशान्य भारतातील 8 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे. यामुळेच ईशान्येचा विकास झाला असल्याचेही शाह (Amit Shah) यांनी सांगितले होते.

(हेही वाचा – Narendra Modi : पालम विमानतळावर जे. पी. नड्डा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत)

एकेकाळी ईशान्य भारत हा काँग्रेसचा गड मानला जात होता. राहुल गांधींनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर ईशान्य भारतात निवडणुका आल्या, त्यानंतर काँग्रेसचा इथून सुपडा साफ झाला. आता काँग्रेस कुठेही दिसत नाही. राहुल गांधी परदेशात जातात तिथे जाऊन देशावर टीका करतात, अशा शब्दांत यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी राहुल गांधींवर टीकाही केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.