मेधा पाटकर पुन्हा अमित शहांच्या ‘टार्गेट’वर

76
एकेकाळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी गुजरातमधील नर्मदा प्रकल्पाला विरोध करून गुजरात सरकारच्या अर्थात त्यावेळेच्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना नाकीनऊ आणली होती, तेव्हापासून मेधा पाटकर हे कायम भाजपच्या रडारवर आहेत. अधूनमधून मेधा पाटकर यांना गुजरातच्या राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयत्न होत होता, मात्र भाजपने तो हाणून पाडला होता. आज पुन्हा मेधा पाटकर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून गुजरातच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र यावेळीही मेधा पाटकर यांना गुजरातच्या राजकारण प्रवेश दिला जाणार नाही, असे अमित शहा म्हणाले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून लढवलेली निवडणूक 

मुंबई दौऱ्यावर येण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरात दौऱ्यावर असताना आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. काही लोक सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शाह यांनी केला. मेधा पाटकर यांनी राज्याची जीवनवाहिनी असलेल्या नर्मदा प्रकल्पाला विरोध केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापक सदस्य पाटकर यांना मुंबईच्या ईशान्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

गुजरातच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना विरोध करा 

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्यासाठी काही लोकांनी नवी सुरुवात केली आहे. मला गुजरातच्या तरुणांना विचारायचे आहे, नर्मदा प्रकल्पाला तसेच गुजरातच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना राज्यात येऊ देणार का?, असा सवाल त्यांनी विचारला. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३६व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभात अमित शाह एका सभेला संबोधित करत होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.